माळशेज घाट महिनाभर बंद करण्याची गावक-यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 16:57 IST2016-07-11T16:57:45+5:302016-07-11T16:57:45+5:30
माळशेज घाटात सोमवारी पुन्हा दरड चार ते पाच ठिकाणी कोसळली असून मुसळधार पाऊस असल्याने माती ढिगारा काढ्यास अडचण येत आहे.

माळशेज घाट महिनाभर बंद करण्याची गावक-यांची मागणी
राजेश भांगे/ऑनलाइन लोकमत
शिरोशी, दि. 11 - माळशेज घाटात सोमवारी पुन्हा दरड चार ते पाच ठिकाणी कोसळली असून मुसळधार पाऊस असल्याने माती ढिगारा काढ्यास अडचण येत आहे. याबाबत बांधकाम अधिकारी दिलीप सरोदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले. घाट मोकळा कधी होईल सांगू शकत नाही.
माळशेज घाटात कल्याणचे प्रांताधिकारी प्रसाद उकिरडे पाटील यांनी भेट दिली असून, त्यांनीही सांगितले की घाट 1 महिना बंद करून पूर्णपणे साफ करून घ्यायला पाहिजे, तरच जीवितहानी टळेल. घाटामध्ये 20 ते 25 ट्रक, टेम्पो, पिकअप आणि जीप, पोलीस जीप अडकून पडल्या असून दोन दिवसांपासून त्यांना मागे पुढे जाण्यासाठी रस्ता नाही. कारण दरड संपूर्ण घाटात कोसळली आहे.