मराठा आरक्षणासाठी पंढरपूरात मतदानावर ग्रामस्थांचा बहिष्कार
By Admin | Updated: February 13, 2017 03:36 IST2017-02-13T03:36:04+5:302017-02-13T03:36:04+5:30
मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार

मराठा आरक्षणासाठी पंढरपूरात मतदानावर ग्रामस्थांचा बहिष्कार
मगरवाडी (जि. सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ठराव तुंगत (ता. पंढरपूर) ग्रामस्थांनी केला आहे़. सकल मराठा समाजाची रविवारी बैठक झाली. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष किरण घाडगे आदी उपस्थित होते. गावातील सर्व राजकीय गटाचे नेते व तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)