ऐनशेतमध्ये एक गाव एक बाप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 02:52 IST2016-09-10T02:52:11+5:302016-09-10T02:52:11+5:30
वाडा तालुक्यातील ऐनशेतचा गणेशोत्सव गेली ६४ वर्षे एक गाव एक गणपती ची परंपरा जोपासत यावर्षीही उत्साहाने सज्ज झालाय.

ऐनशेतमध्ये एक गाव एक बाप्पा
वाडा : सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. अनेक गणेशोत्सवापैकी वाडा तालुक्यातील ऐनशेतचा गणेशोत्सव गेली ६४ वर्षे एक गाव एक गणपती ची परंपरा जोपासत यावर्षीही उत्साहाने सज्ज झालाय. यावर्षी मंडळाने बेटी बचाओ; बेटी पढाओ चा संदेश दिला आहे. ‘आज मुलीचा जीव घेऊन उद्या सून आणाल कोठून’ असा प्रश्न या मंडळाने संदेशाद्वारे नागरिकांना विचारला आहे. सामाजिक एकोपा व सलोख्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या उत्सवाची सुरवात ऐनशेत गावात सन १९५३ साली झाली.
६४ वर्षापूर्वी कोणत्याही सोयी सुविधा नसताना नागरिकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना या गावातील काही होतकरू तरूणांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. प्रत्येकी १ रूपया २५ पैसे वर्गणी काढून हा गणेशोत्सव सुरू झाला. आज या गणेशोत्सवाने ६४ वर्षे पूर्ण केली. यासाठी गावकरी त्या पूर्वजांचे फक्त ऋणच व्यक्त करतात असे नाही तर या ६४ वर्षाच्या कालावधीपेक्षा त्यांनी स्थापन केलेल्या या उत्सवाने गावाला जे दिले. जी संस्कृती दिली त्याचे महत्व ग्रामस्थ व कार्यकर्ते अभिमानाने सांगतात.
६४ वर्षे अखंडपणे आणि एकोप्याने हा उत्सव साजरा होतो . गावातील ४ थी पिढी हा उत्सव साजरा करतेय. या चार पिढ्यांमध्ये या उत्सवाची कमान चढतीच राहिली आहे. सव्वा रूपये वर्गणीने सुरू झालेल्या गणेशोत्सवात आज रोजी सव्वा लाख रु पये वर्गणी स्वखुशीने व सढळहस्ते मंडळाच्या मंडपात ही वर्गणी आणून दिली जाते हे या उत्सवाचे यश आहे. ऐनशेतच्या गणेशोत्सवाने गावातील तरूणांना एकत्र यायला शिकविले एकत्र बसायला शिकविले बैठकीतून गावाच्या प्रगतीचे विकासाचे नियोजन करायला शिकवले ही संस्कृती या गावातील पूर्वजांनी या गावाला लावून दिली आहे. तेव्हाचा तरूण असाच एकत्र येऊन निर्णय घेत होता. आजही घेतोय. कारण संपूर्ण गावातील सर्व नागरिक एकत्र येण्याचा योग म्हणजे गणेशोत्सव आहे. ऐनशेतच्या गणेशोत्सवाने जसे तरूणांना एकत्र आणले लहान विद्यार्थ्यांनाही गोडी लावली. ज्येष्ठांना मार्गदर्शनाची संधी दिली. (वार्ताहर)
>गुणवंत विद्यार्थी व्यक्तींचा सत्कार
या उत्सवातून रक्तदान शिबिर, विविध नामवंताचे मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थी व्यक्तींचा सत्कार, गावातील ज्येष्ठांचा सत्कार, गरजवंताना मदत, गावातील आपदग्रस्तांना मदत, विद्यार्थाना बक्षिसे असे अनेक उपक्र म गेली ६४ वर्षे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहेत. यावर्षी बेटी पढाओ बेटी बचाओ चा संदेश देण्यात आला आहे. या मंडळाने अनेक पुरस्कार ही मिळवाले आहेत अशी माहिती अध्यक्ष मोरेश्वर ठा।करे यांनी दिली आहे.
>महिलांचा
सक्रीय सहभाग
गणेशोत्सवातील महिलांचा सहभाग हे या गणेशोत्सवाचे वैशिष्टय आहे. समुह नृत्य असो, भजन असो, स्पर्धा असोत, सांस्कृतिक कार्यक्र म असोत किंवा एखादी जबाबदारी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा एक परिपाठ निर्माण झाला आहे.
सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचा गावात राहणारे कुणबी, वारली, कोळी, कातकरी समाजापैकी कोणतेही समाज या उत्सवापासून दूर राहात नाही. उत्सवाची आखणी करण्यापासून सर्वाचाच सहभाग असता अशी माहिती उत्सवाचे अध्यक्ष मोरेश्वर ठाकरे यांनी दिली.