शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"विलासराव देशमुखांनी काँग्रेस सोडली होती...", सोशल मीडियावर पोस्ट अन् रितेशची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 19:47 IST

Riteish Deshmukh on Father Vilasrao Deshmukh: रविवारी लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. 

Riteish Deshmukh News: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख कायम प्रसिद्धीच्या झोतात असतो. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारा रितेश अनेकदा चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसतो. आज रविवारी लातूर येथे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. या सोहळ्याला संबोधित करताना विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने विविध बाबींवर भाष्य केले. तसेच यावेळी तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

अशातच सोशल मीडियावर एका यूजरने विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडल्याचा दावा केला. तसेच त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. या पोस्टवर रितेश देशमुखने मोजक्याच शब्दांत संतप्त प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, हे असत्य आहे, कृपया जा आणि तथ्य तपासा... खरं तर सध्या काँग्रेस नेते आपला पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करण्याची मालिका सुरू आहे. 

यूजरच्या पोस्टवर रितेशची प्रतिक्रिया 'मी भारतीय' नावाच्या यूजरने लिहिले, "विलासराव देशमुख काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. काँग्रेस सोडण्याचे त्यांच्या मनातही आले नाही, असे रितेश देशमुखने म्हटले. पण, सत्य असे आहे की, विलासराव देशमुख यांनी काँग्रेस सोडली होती आणि विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती."

दरम्यान, विलास कारखाना परिसरात आयोजित सोहळ्यात बोलताना विलासराव देशमुख यांचा पुत्र आणि अभिनेता रितेशला वडिलांच्या आठवणीने हुंदका आला. डोळे पानावले. अख्खे भाषण त्याने कंठ दाटलेल्या स्वरात केले. रितेशचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले. भाषण थांबले. त्यावेळी रितेशच्या आई वैशालीताई देशमुख यांचे डोळे पाणावले. बाजूला बंधू माजी मंत्री अमित देशमुख यांनी रितेशच्या पाठीवर हात ठेवत धीर दिला. त्यावेळी आई वैशालीताई आणि काका दिलीपराव देशमुख यांच्यासह मंचावर आणि उपस्थित अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.  

टॅग्स :Ritesh Deshmukhरितेश देशमुखcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना