विक्रमगडातील १७ धोकादायक
By Admin | Updated: August 5, 2016 02:48 IST2016-08-05T02:48:57+5:302016-08-05T02:48:57+5:30
महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुल वाहून गेल्याच्या अपघाती घटनेच्या पार्श्वभूमीवर विक्रमगड तालुक्यातही तसा प्रकार घडू शकतो.

विक्रमगडातील १७ धोकादायक
विक्रमगड : महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुल वाहून गेल्याच्या अपघाती घटनेच्या पार्श्वभूमीवर विक्रमगड तालुक्यातही तसा प्रकार घडू शकतो. तालुक्यातील १७ पुल दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असून काही संस्थानकालिन असल्याने पडण्याच्या अवस्थेत आहेत.
तालुक्यामध्ये कशिवली पूल, तांबाडीनदीवरील पूुल, साखरे पूल, देहेर्जे पूल, नागझरी पूल, खांडचा पूल, जांभा पूल, बालापुर पूल, सवादे पूल, तलवाडा पूल, कासा पूल,वेहेलपाडा पूल, तलावली पूल, वाकडुचापाडा पूल, आपटीचा पूल, बोरांडा पूल व आंबेघर पूल असून यातील काही जीर्णावस्थेत आहेत. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलमपट्टी होत असली तरी गत पंधरा दिवसांत त्यांची अग्नीपरीक्षाच झाली आहे. कशिवलीगावाजवळ नदीवर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळयÞात या पुलावरून पाणी जात असते. त्यातच या पुलाला संरक्षक कठडे नसल्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. (वार्ताहर)
>देहर्जे नदीवरील
पूल धोकादायक
विक्र मगड तालुक्यातील कुंर्झे गावाजवळ देहर्जे नदीवर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळयÞात या पुलावरून पाणी जात असते. त्यामुळे गेली कित्येक वर्षापासून पुलावरील डांबर वाहून गेल्याने यामुळे त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले असून गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विक्रमगड व वाडा तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या व कुंर्झे गावाजवळचा देहर्जे नदीवरील पूल फार जुना असून, कमी उंचीचा आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळयात वीस ते पंचवीस वेळा या पुलावरून पाणी जात असते.