शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

...अन् धड्यातील‘आवडता खेळाडू’ साक्षात भेटला; झेडपी शाळेत सचिन तेंडुलकरची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 07:59 IST

इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकात कोलाज  (बायोग्राफी) धड्यात ‘सचिन रमेश तेंडुलकर माझा आवडता खेळाडू’ हा धडा आहे

राजकुमार चुनारकरचिमूर (जि. चंद्रपूर) : त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ज्याला आतापर्यंत फक्त टीव्हीवर आणि पाठ्यपुस्तकातील धड्यात बघितलं, तो त्यांचा आवडता खेळाडू चक्क त्यांच्या पुढ्यात उभा होता. होय, अलिझंझाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विक्रमादित्य भारतरत्न सचिन तेंडुलकर दाखल झाला आणि चिमुकली मुले हरखून गेली...

इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकात कोलाज  (बायोग्राफी) धड्यात ‘सचिन रमेश तेंडुलकर माझा आवडता खेळाडू’ हा धडा आहे. या धड्यातील कॅरेक्टर सचिनने साक्षात या शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी हितगूज केल्याने विद्यार्थी व शिक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. क्रिकेटचा देव अशी पदवी खेळरसिकांनी बहाल केलेला सचिन ताडोबातील वाघांच्या भेटीसाठी शनिवारपासून चिमूर तालुक्यातील एका रिसॉर्टमध्ये पत्नी अंजली व मित्रपरिवारासोबत मुक्कामी आहे. सोमवारी अलिझंझा बफर गेटमधून दुपारच्या सफारीसाठी जात असताना पावणेतीनच्या सुमारास आदिवासीबहुल पाच-सहाशे लोकसंख्या असलेल्या अलिझंझा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अचानकपणे सगळे अवतरले. हे अनपेक्षित दृश्य बघून शाळेतील मुख्याध्यापक रमेश बदके व शिक्षक मनीषा बावनकर  व विद्यार्थ्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.

धडा पाहताच गहिवरले सचिनचे मन सचिन तेंडुलकरने शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगूज केले. दरम्यान, चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पुस्तकात असलेल्या कोलाज नावाच्या (बायोग्राफी) धड्यातील सचिनचा धडा सचिनलाच दाखविला. तो धडा पाहताच सचिनचे मन गहिवरले. थोड्या वेळासाठी सचिन शांत झाला. यानंतर सचिनने विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत भविष्यात तुम्ही काय बनणार, असा प्रश्न केला असता सृष्टी रघुनाथ मेश्राम हिने डॉक्टर आणि जान्हवी सुभाष नागोसे व नैतिक अशोक धारणे यांनी मला इंजिनिअर व्हायचे आहे, असे सांगितले. सृष्टीने समाज व रुग्णाची सेवा, तर नैतिक व जान्हवीने इंजिनिअर क्षेत्रात संशोधनात्मक कार्य करणार असल्याचे  सांगितले. सचिनने शाळेची प्रगती जाणून घेतली.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकर