विजया मेहता यांना ‘मराठी यशवंत पुरस्कार’

By Admin | Updated: October 20, 2015 01:55 IST2015-10-20T01:55:10+5:302015-10-20T01:55:10+5:30

ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा डॉ.भालेराव पुरस्कृत ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अभिनेते अरुण नलावडे यांना के. नारायण काळे

Vijaya Mehta wins 'Marathi Yashwant Award' | विजया मेहता यांना ‘मराठी यशवंत पुरस्कार’

विजया मेहता यांना ‘मराठी यशवंत पुरस्कार’

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा डॉ.भालेराव पुरस्कृत ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अभिनेते अरुण नलावडे यांना के. नारायण काळे पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण मुंबई मराठी साहित्य संघाच्या ८० व्या वर्धापनदिनी २८ आॅक्टोबर रोजी डॉ. अ. ना भालेराव नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता करण्यात येईल.
संघातर्फे रा.भि.जोशी स्मरणार्थ नीलिमा भावे पुरस्कृत वैचारिक साहित्य पुरस्कार दाऊद दळवी, लक्ष्मीकांत बाबूराव चंद्रगिरी स्मृतिप्रित्यर्थ साहित्य कादंबरी पुरस्कार सीताराम सावंत यांना जाहीर झाले असून विलास केळसकर यांना कथाकार शांताराम पुरस्कार, डॉ. नीलिमा गुंडी यांना माधव ज्युलियन पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यावेळी उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)

Web Title: Vijaya Mehta wins 'Marathi Yashwant Award'