चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी विजय पाटकर
By Admin | Updated: November 9, 2014 01:55 IST2014-11-09T01:55:35+5:302014-11-09T01:55:35+5:30
दोन महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावर अखेर शनिवारी अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांची वर्णी लागली.

चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी विजय पाटकर
कोल्हापूर : दोन महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावर अखेर शनिवारी अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांची वर्णी लागली. या निवडीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटकर यांनी सर्व सभासदांना बरोबर घेऊन कोल्हापूर चित्रनगरीचा विकास आणि वृद्ध कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही दिली.
चित्रपट महामंडळाच्या कोल्हापुरातील कार्यालयात शनिवारी दुपारी एक वाजता अध्यक्ष निवडीची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, माजी अध्यक्ष प्रसाद सुव्रे, खजिनदार सतीश बिडकर, अभिनेत्री अलका कुबल, संचालक संजीव नाईक, अनिल निकम, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती उपस्थित होते. चित्रपट महामंडळाच्या 27 ऑगस्ट 2क्13 रोजी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी दावा केलेले विजय कोंडके व विजय पाटकर यांना समान मते पडल्यानंतर या दोघांनाही एक-एक वर्षासाठी अध्यक्षपदाचा कालावधी देण्यात आला होता. दरम्यात विनयभंगाचा आरोप प्रकरणात कोंडके यांचा भुमिकेमुळे त्यांना पदमुक्त करण्यात आले. (प्रतिनिधी)