विजय दर्डा यांनी घेतले भारी गाव दत्तक
By Admin | Updated: November 19, 2014 00:56 IST2014-11-19T00:56:52+5:302014-11-19T00:56:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन विकसित करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा

विजय दर्डा यांनी घेतले भारी गाव दत्तक
सांसद आदर्श ग्राम : नागरिकांच्या सहकार्याने सर्वांगीण विकास
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन विकसित करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी यवतमाळ तालुक्यातील भारी हे गाव दत्तक घेतले. नागरिकांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
केंद्र शासनाच्यावतीने सांसद आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने या योजनेबाबतचे दिशानिर्देश जारी केले आहे. केंद्र सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार विजय दर्डा यांनी भारी गावाची निवड केली आहे. जिल्हा ठिकाणापासून सात किलोमीटर अंतरावर भारी हे गाव आहे. मात्र विकासाच्या विविध योजना येथपर्यंत पोहोचल्याच नाहीत.
त्यामुळे खासदार विजय दर्डा यांनी या गावाची निवड केली आहे. भारी या गावातील नागरिकांच्या सहकार्याने संपूर्ण गावाचा कायापालट करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी याबाबत माहिती दिली असून खासदार दर्डा लवकरच भारी गावाला भेट देणार आहेत.
या गावात कोणकोणती विकास कामे करता येईल, याबाबत गावकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. संपूर्ण गावाच्या विकासाचा त्यांनी ध्यास घेतला असून गावाला आदर्श गावाचा दर्जा मिळवून देऊ, असे सांगितले. (नगर प्रतिनिधी)