शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत मजा मारा : शिंदे गट; सुप्रीम कोर्टात जाऊ : ठाकरे गट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 06:29 IST

सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपर्यंतचा आदेश दिला आहे. एक आठवडा उद्या संपतोय. एक आठवडा राहतोय.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटासह सर्व ५६ आमदारांना व्हिप बजावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार व्हिप जारी करण्यात आल्याचे सोमवारी गोगावले यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाकडून मात्र व्हिप बजावला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचा इशारा देण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपर्यंतचा आदेश दिला आहे. एक आठवडा उद्या संपतोय. एक आठवडा राहतोय. त्यामुळे दोन आठवडे कोणतीही कारवाई करणार नाही. तोपर्यंत मजा मारा; पण त्यानंतर पक्षादेश पाळावाच लागेल, असे गोगावले यांनी सोमवारी बजावले.

ते म्हणाले, “अधिवेशनाला हजर राहावे, असा व्हिप आमदारांना बजावला आहे. हा कारवाईचा व्हिप नाही. दोन आठवड्यांनंतर कोर्ट जो आदेश देईल, त्यानुसार निर्णय घेऊ. व्हिपचे पालन न केल्यास कारवाई करू. आम्ही गद्दार असतो तर शिवसेना नाव मिळाले नसते.” 

व्हिप ही तर ‘कोंबडीहूल’n ठाकरे गटातही व्हिपबाबत संभ्रम होता. प्रत्येक आमदार एकमेकाला व्हिप आला का, असे विचारत होता. n ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केल्यास काेर्टात अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशारा दिला. n भास्कर जाधव म्हणाले, “बातम्या पसरवून कोणीही घाबरणार नाही. कोकणात याला कोंबडीहूल म्हणतात. त्याला कोणीही भीक घालत नाही.”

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभाBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन