शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लाज वाटते का..? असे कुणी कुणाला नाही विचारायचे; अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 08:46 IST

सरकारला लाज वाटते का किंवा विरोधकांना लाज वाटते का, असे विचारणे म्हणजे असंसदीय भाषा वापरणे आहे, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

मुंबई - एखाद्याला लाज वाटते आहे का, असा प्रश्न विचारल्यास हा शब्दप्रयोग असंसदीय असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिला. विधानपरिषदेत सोमवारी शिवीगाळ झाली होती, मंगळवारी लाजेचा विषय निघाला. 

महाराष्ट्राला जोडणाऱ्या ‘लालपरी’ची म्हणजेच एसटीची रडकथा आज विधानसभेत मांडली गेली आणि सर्वपक्षीय सदस्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. आमदार कृष्णा गजबे, बंटी भांगडिया, सुभाष देशमुख, रणधीर सावरकर आदी आमदारांनी हा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. मंत्री दादा भुसे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांबद्दल स्थापित समितीच्या दोन बैठका झाल्या असून, लवकरात लवकर समितीचा अहवाल घेऊन हे प्रश्न सोडवले जातील, असे सांगितले. फेब्रुवारीमधे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दोन आठवडे उपोषण केले होते. 

हे असंसदीयच..लाज वाटणे म्हणजे नेमके काय, शरम वाटणे म्हणजे नेमके काय... आपल्याकडून चुकीचे वर्तन झाल्यास एखाद्या व्यक्तीला लाज वाटते किंवा शरम वाटते. भले ती व्यक्त होवो वा न होवो; पण सरकारकडून असे काही झाले तर लाज वाटते का किंवा शरम वाटते का... वाटो वा, न वाटो; पण सरकारला लाज वाटते का, असा शब्दप्रयोग करणे राज्याच्या विधानसभेने यापूर्वीच असंसदीय ठरवलेले आहे. थोडक्यात, सरकारला लाज वाटते का किंवा विरोधकांना लाज वाटते का, असे विचारणे म्हणजे असंसदीय भाषा वापरणे आहे, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

बच्चू कडू झाले संतप्त अन् म्हणाले...त्यावेळी उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेनंतर संघटनेने उपोषण मागे घेतले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार दहा तारखेच्या आत दिले जातात, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले; तसेच बाकीच्या विषयांबद्दल समितीचा अहवाल प्राप्त करून घेऊन कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांनी संतप्त प्रश्न विचारत सरकारला लाज कशी वाटत नाही आणि सरकार असत्य सांगत असेल तर कुणाच्या मुस्काटात मारायची, असा प्रश्न विचारला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही सदस्यांनी किंवा मंत्र्यांनीही असंसदीय शब्द वापरला तर तो कामकाजातून काढला जाईल.

‘लाज वाटत असेल तर’ हा शब्दप्रयोग असंसदीय असल्याचा निवाडा विधानसभेत यापूर्वी दिला गेला असल्याचे निदर्शनास आणून देत बच्चू कडू, तसेच दादा भुसे यांनी वापरलेले हे शब्द कामकाजातून काढून टाकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, एसटीच्या वाहक आणि चालक यांना ३८ हजार रुपये सरासरी पगार मिळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाRahul Narvekarराहुल नार्वेकरBacchu Kaduबच्चू कडू