शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 15:22 IST

Vidhan Parishad Election - राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर जागांसाठी येत्या २७ जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. ११ सदस्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ येत्या २७ जुलैला संपत आहे त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

कोण सदस्य निवृत्त होणार?

डॉ. मनीषा कायंदेविजय गिरकरअब्दुल्ला खान दुर्रानीनिलय नाईकअनिल परबरमेश पाटीलरामराव पाटीलडॉ.वजहत मिर्झाप्रज्ञा सातवमहादेव जानकरजयंत पाटील

या ११ जणांचा विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ २७ जुलैला संपत आहे. तत्पूर्वी या जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. १२ जुलैला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

नोटिफिकेशन - २५ जून २०२४, मंगळवारअर्ज भरण्याची शेवटची तारीख - २ जुलै २०२४ मंगळवारउमेदवारांच्या अर्जाची छाननी - ३ जुलै २०२४, बुधवारउमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - ५ जुलै २०२४, शुक्रवारमतदान - १२ जुलै २०२४, वेळ - सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंतमतमोजणी - १२ जुलै २०२४, शुक्रवार - संध्याकाळी ५ वाजता

विधान परिषदेच्या ७८ जागांपैकी ३० सदस्य विधानसभा आमदारांकडून मतदानाने निवडले जातात. त्यांच्यापैकी निलय नाईक, रामराव पाटील, रमेश पाटील, विजय गिरकर हे भाजपाचे सदस्य आहेत. तर मनीषा कायंदे शिवसेना शिंदे गट, अनिल परब शिवसेना ठाकरे गट, बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी काँग्रेस, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव हे काँग्रेसचे आणि जयंत पाटील शेकाप, महादेव जानकर रासप हे ११ सदस्य १० जुलै २०१८ रोजी बिनविरोध निवडून आले होते. त्यांची मुदत २७ जुलैला संपत आहे. तर अद्यापही विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त आहे. मविआ सरकारच्या काळात १२ जणांची यादी राज्यपालांकडे सोपवली होती परंतु त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली नाही.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग