शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Vidhan Parishad Election: शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ; भाजप, काँग्रेसची अडचण, कसं जुळणार समीकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 12:07 IST

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषद निवडणुकीत पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी प्रचंड जिकिरीचे दिसत असून, दुसरी जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागत आहे. 

मुंबई : विधान परिषद निवडणुकीत पाचवी जागा निवडून आणणे भाजपसाठी प्रचंड जिकिरीचे दिसत असून, दुसरी जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागत आहे. 

भाजपचे नेते चमत्काराची भाषा करीत असले तरी, प्रत्यक्ष आकडेवारी बघता त्यांचा पाचव्या जागेवरील विजय कठीण दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपचे नेते रणनीतीवर लक्ष केंद्रित करीत होते. यावेळी ते विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात मश्गुल दिसत आहेत. लहान पक्ष आणि अपक्षांच्या मतांना याहीवेळी प्रचंड महत्त्व आले असले तरी, गुप्त मतदानाचा फायदा घेत मोठ्या पक्षांच्या मतांतही भाजपला फोडाफोडी करावी लागणार, अशी स्थिती आहे. लहान पक्ष आणि अपक्षांची तब्बल २९ मते आहेत.

भाजपचे नेते चमत्काराची भाषा पुन्हा एकदा करीत महाविकास आघाडीला डिवचण्याचे काम करत असल्याने आघाडीच्या आमदारांचे ऐक्य अबाधित ठेवून भाजपला धडा शिकवा, असा सूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री बोलाविलेल्या तीन पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत व्यक्त केला होता. हे ऐक्य कायम ठेवतानाच मतदानाचे अचूक व्यवस्थापन करण्यावर आघाडीकडून भर दिला जाणार आहे. 

राऊत यांना माझा मताधिकार द्या : आ. भुयारराज्यसभा निवडणुकीत मी महाविकास आघाडीला मतदान केले नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. मी महाविकास आघाडीसोबतच होतो आणि आहे. आता राऊत यांना विश्वास नसेल तर मी विधान परिषदेसाठी मत देत असताना राऊत यांना एकतर माझ्या बाजूला उभे करा किंवा माझे मत देण्याचा अधिकार त्यांना द्या, असा उपरोधिक टोला अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी हाणला.

आघाडीसोबतच, पण मत कोणाला ते नाही सांगणार राऊत यांनी नाव घेतलेले दुसरे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी, ते महाविकास आघाडीसोबत असल्याचे सांगितले. पण मतदान कोणाला करणार ते सांगणार नाही, असेही ते म्हणाले. 

भाजपचे जादूटोण्याचे दुकान आहे का? : राऊतभाजपवाले सारखे चमत्कार करू म्हणताहेत, त्यांचे जादुटोण्याचे,लिंबू-मिरचीचे दुकान आहे का, असा सवाल शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी केला. 

थोरात, चव्हाण यांची अजित पवार यांच्याशी चर्चाकाँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा केली. कोणाकडे निवडणुकीचे कौशल्य आहे आणि कोणाकडे नाही, हे निकालामध्ये कळेलच, असे आव्हान पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आधीच दिले आहे. 

कुणाचे पारडे, किती जड?शिवसेनास्वत:ची मते     ५५अपक्षांची मते     ७ एकूण     ६२राष्ट्रवादीस्वत:ची मते     ५१अपक्षांची मते     ४एकूण     ५५

काँग्रेसस्वत:ची मते     ४४अपक्षांची मते     ००एकूण     ४४दोन जागांसाठी मते हवी     ८

भाजप स्वत:ची मते     १०६अपक्षांची मते     ६एकूण     ११२राज्यसभा निवडणुकीत मिळालेली मते     १२३पाचवी जागा निवडून आणण्यासाठीची मते     १३०

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा