शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

Vidhan Parishad Election: एकनाथ शिंदे, अजित पवारांचं शेवटच्या क्षणी मतदान; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 15:45 IST

सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपानेही टप्प्याटप्प्याने आमदारांना मतदान करण्यास सांगितले.

मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत २७९ आमदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीसाठी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक आजारी असतानाही मतदानासाठी विधान भवनात दाखल झाले. आता या निवडणुकीच्या मतदानाला काही मिनिटं शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, एकनाथ शिंदे मतदान शेवटच्या क्षणी करत आहेत. 

विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत नवाब मलिक, अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी हायकोर्टाने नाकारली. तर शिवसेनेचे अंधेरी पुर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे विधान परिषदेसाठी २८५ आमदार मतदान करू शकतात. सकाळी ९ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत मतदानाची मुदत आहे. या निवडणुकीत कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी प्रत्येक पक्षाने खबरदारी घेतली आहे. 

सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपानेही टप्प्याटप्प्याने आमदारांना मतदान करण्यास सांगितले. दुपारी १२ च्या सुमारास शिवसेनेच्या आमदारांनी मतदानाल सुरूवात केली. आतापर्यंत २७९ आमदारांनी मतदान केले आहे. यानंतर आता महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील मतदानाला गेले आहे. 

नवाब मलिक, अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टानेही परवानगी नाकारली हायकोर्टाने मलिक-देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर दोघांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. दुपारी २ वाजता ही सुनावणी सुरू झाली. तेव्हा जर मतदानाची परवानगी दिली तर मतदान करू शकता का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या वकिलांना विचारणा केली. मात्र हायकोर्टाने उशीरा निकाल पत्र दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात येण्यास उशीरा झाला असं सांगण्यात आले. परंतु या प्रकरणावर तातडीने निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत मतदानाला परवानगी देण्याची याचिका फेटाळून लावली. 

मुख्यमंत्र्यांना धक्का बसेल - रवी राणा महाविकास आघाडीची बिघाडी होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात मतांचे परिवर्तन भाजपाकडे झाले आहे. अपक्षांची मदत आणि काही मविआ आमदारांची साथ यामुळे भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून येईल. या निकालाचा परिणाम पाहून मुख्यमंत्र्यांना धक्का बसेल असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे