शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांबाबत विधानभवनच्या पुढाकाराचा पुरता फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 01:40 IST

साधारणपणे ३० एप्रिल रोजी विधानमंडळा सचिवालयाने सर्व आमदारांना असे कळविले की त्यांच्या मतदारसंघातील जे लोक बाहेरगावी अडकलेले आहेत त्यांना मूळ गावी आणायचे असल्यास त्यांची नावे व इतर माहिती विधान मंडळास कळवावी.

मुंबई : मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाने घेतलेल्या पुढाकाराचा फज्जा उडाला आहे.या पुढाकारातून एकाही मजुरांचे स्थलांतर होऊ शकले नाही. प्रशासकीय यंत्रणेने योग्य दखल घेत सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती असे मत आमदारांनी व्यक्त केले.साधारणपणे ३० एप्रिल रोजी विधानमंडळा सचिवालयाने सर्व आमदारांना असे कळविले की त्यांच्या मतदारसंघातील जे लोक बाहेरगावी अडकलेले आहेत त्यांना मूळ गावी आणायचे असल्यास त्यांची नावे व इतर माहिती विधान मंडळास कळवावी. राज्यात तसेच राज्याबाहेरील अडकलेल्या व्यक्तींचीही माहिती मागवण्यात आली होती. त्यासाठी विधान भवनात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला.कारंजा, जिल्हा वाशिमचे आमदार राजेंद्र पाटणी आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी याबाबतचा कटू अनुभव लोकमतला सांगितला.आम्ही विधानभवनच्या नियंत्रण कक्षाकडे शेकडो नावे पत्ता, मोबाईल नंबरसह पाठवली. काही दिवसांनंतर विधानमंडळ सचिवा लया कडे विचारणा केली असता ती नावे मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभागात पाठवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र विधानमंडळाने उभारलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून आजवर एकाही व्यक्तीचे स्थलांतर होऊ शकलेले नाही.विधानमंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अडकलेल्या व्यक्तींना मूळगावी पोहोचवण्यासाठीची यंत्रणा आमच्याकडे नाही.अर्थातच आम्ही मदत व पुनर्वसन विभागाला कळवले.सूत्रांनी सांगितले की मदत व पुनर्वसन विभागातून या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयांकडून त्या तहसीलदारांना पाठवण्यात आल्या आणि आता उपजिल्हाधिकारी, तहसीलदार हे आमदारांना फोन करून स्थलांतराचे काय करायचे अशी विचारणा करीत आहेत. आमदारांनी केलेली विचारणा फिरून त्यांनाच करण्यात येत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या