व्हिडीओ - अकोल्यात शाहु, फुले, आंबेडकरी शक्तीचा निषेध मोर्चा
By Admin | Updated: June 28, 2016 15:41 IST2016-06-28T14:10:54+5:302016-06-28T15:41:31+5:30
दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ही ऐतिहासिक वास्तू पाडल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिव, शाहु, फुले, आंबेडकर बहुजन युवा शक्तीच्यावतीने अकोल्यात मोर्चा काढण्यात आला.

व्हिडीओ - अकोल्यात शाहु, फुले, आंबेडकरी शक्तीचा निषेध मोर्चा
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २८ - दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ही ऐतिहासिक वास्तू पाडल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिव, शाहु, फुले, आंबेडकर बहुजन युवा शक्तीच्यावतीने मंगळवारी अकोला येथे मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटीका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. तेथे जिल्हाधिका-यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले.