VIDEO : मीरारोड स्थानकात ओव्हरहेड वायरच्या धक्क्याने तरूण गंभीर जखमी
By Admin | Updated: August 23, 2016 12:17 IST2016-08-23T11:58:41+5:302016-08-23T12:17:12+5:30
मीरा रोड स्थानकात ओव्हरहेड वायरचा जबर धक्का लागल्याने एक गतिमंद तरूण ८० टक्के भाजल्याची धक्कादायक घटना घडली.

VIDEO : मीरारोड स्थानकात ओव्हरहेड वायरच्या धक्क्याने तरूण गंभीर जखमी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - पश्चिम रेल्वेच्या मीरा रोड स्थानकात ओव्हरहेड वायरचा जबर धक्का लागल्याने एक गतिमंद तरूण ८० टक्के भाजला आहे. सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून गंभीर जखमी झालेल्या तरूणावर वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी एक अज्ञात गतिमंद तरूण मीरा रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील छतावर चढला आणि तेथून त्याने ओव्हरहेड वायर्सवर उडी मारल्याने तो जबर जखमी झाला. अचानक घडलेल्या या घटनेने स्थानकातील प्रवाशांचा एकच थरकाप उडाला. उच्चदाब असलेल्या वायरच्या संपर्कात आल्याने त्या तरूणाला तीव्र झटका लागला व तो खाली फेकला गेला.
रेल्वे अधिका-यांनी ताताडीने घटनास्थळी धाव घेत त्या तरूणाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.