VIDEO : युवक राष्ट्रवादीने घातले रस्त्यावरील खड्ड्याचे वर्षश्राद्ध

By Admin | Updated: August 31, 2016 15:34 IST2016-08-31T15:34:49+5:302016-08-31T15:34:49+5:30

शहरातील फेम टॉकीज मागे असणारा अशोका मार्ग दुरुस्ती करण्याबाबत निधी मंजूर होऊनही सरकारच्या उदासीनतेमुळे रस्ता दुरुस्त होत नसल्याने युवक राष्ट्रवादीचे

VIDEO: The year-old pothole on the road laid by the NCP, youth | VIDEO : युवक राष्ट्रवादीने घातले रस्त्यावरील खड्ड्याचे वर्षश्राद्ध

VIDEO : युवक राष्ट्रवादीने घातले रस्त्यावरील खड्ड्याचे वर्षश्राद्ध

>- पंकज पाटील
नाशिक, दि. 31  – शहरातील फेम टॉकीज मागे असणारा अशोका मार्ग  दुरुस्ती करण्याबाबत निधी मंजूर होऊनही  सरकारच्या उदासीनतेमुळे रस्ता दुरुस्त होत नसल्याने युवक राष्ट्रवादीचे नाशिकरोड अध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी आज या रस्त्यावरील खड्ड्याचे वर्षश्राद्ध घातले.
शहरातील अशोक मार्ग हा रहदारीचा मार्ग असल्याने या मार्गावरून वाहनांची ये जा असते. नाशिक रोड वरून मुबई नाका येथे जाण्यास शक्यतो याच मार्गाचा वाहनचालक मोठ्या संख्येने वापर करतात.  या मार्गावर लोकवस्ती, शाळा व कॉर्पोरेट ऑफिस असल्याने हा मार्ग नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून येथे नेहमी वर्दळ असते. परंतु गेल्या काही वर्षापासून या रस्त्याची जागा खड्ड्यांनी घेतली असून रस्त्याची अक्षरशः चालण झालेली बघावयास मिळत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करून निधी मंजूर झाला खरा परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे या रस्त्याचे काम रखडलेले बघावयास मिळत आहे. या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधीचे लक्ष नागरिकांकडे नसल्याचे बघावयास मिळते. या गंभीर बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खड्डेमय असलेल्या या रस्त्यात युवक राष्ट्रवादीकडून अनोखी शक्कल लढवत या ठिकाणी आज या रस्त्याचे श्राद्ध घातले.
या प्रसंगी सिडको अध्यक्ष मुकेश शेवाळे, कुणाल बागडे, सौरभ मोहटे, सोनू दोंदे, किरण पगारे, शुभम नकवाळ, विकी यंदे, राकेश निकम, कैनय्या पाटील, स्वप्निल सोनवणे, चेतन थोरात आदि सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: VIDEO: The year-old pothole on the road laid by the NCP, youth