VIDEO - भाईंदर पोलीस ठाण्याच्या आवारात महिला, पुरुषांची हाणामारी

By Admin | Updated: November 11, 2016 17:51 IST2016-11-11T17:51:00+5:302016-11-11T17:51:00+5:30

ऑनलाइन लोकमत/राजू काळे भाईंदर, दि. 11 - भाईंदर पोलीस ठाण्याच्या आवारात आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एका समाजातील ...

VIDEO - Women and men's tragedy in the premises of Bhaindar police station | VIDEO - भाईंदर पोलीस ठाण्याच्या आवारात महिला, पुरुषांची हाणामारी

VIDEO - भाईंदर पोलीस ठाण्याच्या आवारात महिला, पुरुषांची हाणामारी

ऑनलाइन लोकमत/राजू काळे भाईंदर, दि. 11 - भाईंदर पोलीस ठाण्याच्या आवारात आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एका समाजातील महिलांसह पुरुषांची काही कारणावरुन हाणामारी सुरू झाली. याची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न केला.या हाणामारीचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, हाणामारी करणारे इतके बेभान होते कि ते पोलीसांच्या समोरही एकमेकांवर तुटून पडले. त्यातच नोटा बदण्यासाठी बँकांबाहेर लागलेल्या रांगा आवरण्यात व्यस्त असलेल्या संयमाचा बांध अखेर तुटला आणि त्यांनी हाणामारी करणाऱ्या महिला व पुरूषांना त्यांच्या पद्धतीने समज देण्यास सुरूवात केली. सर्व भांडखोरांना ताब्यात घेत त्यांना पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात नेले. ही हाणामारी इतकी भयानक होती की, त्यातील महिलांच्या बांगड्यांचे तुकडे, चपला व डोक्यावरील केस उपटून पोलीस ठाण्याच्या आवारात अस्ताव्यस्त पडले होते.https://www.dailymotion.com/video/x844hlx

Web Title: VIDEO - Women and men's tragedy in the premises of Bhaindar police station