VIDEO: विसर्जन करताना तराफा उलटून आमदार पडले खदाणीत
By Admin | Updated: September 10, 2016 19:51 IST2016-09-10T17:03:58+5:302016-09-10T19:51:14+5:30
घरगुती गणेश विसर्जनासाठी गेले असता तराफा उलटल्याने आमदार सुरेश हाळवणकर खदाणीत पडले. इचलकरंजीतील शहापूर खदाणीत ही घटना घडली.

VIDEO: विसर्जन करताना तराफा उलटून आमदार पडले खदाणीत
- ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 10 - घरगुती गणेश विसर्जनासाठी गेले असता तराफा उलटल्याने आमदार सुरेश हाळवणकर खदाणीत पडले. इचलकरंजीतील शहापूर खदाणीत ही घटना घडली. तराफ्यावर प्रमाणापेक्षा जास्त लोक उभे राहिल्याने तराफा उलटला आणि आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासहित उपस्थित असलेले सर्वजण खदाणीत पडले. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासहित त्यांची दोन मुलेदेखील होती. याव्यतिरिक्त अप्पर पोलिस अधिक्षक दिनेश बारी, डीवायएसपी विनायक नरळे, शाहपूरचे पोलिस निरीक्षक सतिश पवार, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, आरोग्य अधिकारी सुनिल दत्त संगेवार, नगरसेवक भाऊसो आवळे हेदेखील पाण्यात पडले. तराफा उलटल्यानंतर जवानांनी तात्राळ धाव घेत सर्वांना वाचवले. ज्यांना पोहता येत होते त्यांनी किनारा गाठला मात्र मुख्याधिकारी रसाळ यांना पोहता येत नसल्याने काहीवेळ त्यांनी गटांगळ्या खाल्ल्या.
पणजी येथील सांत इनेज खाडीची पाहणी करताना पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो अशाच प्रकारे दोन महिन्यांपूर्वी खाडीत पडले होते.