VIDEO: ...जेव्हा कुत्रे बिबट्याला पळवून लावतात

By Admin | Updated: March 3, 2017 11:48 IST2017-03-03T11:35:00+5:302017-03-03T11:48:47+5:30

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 3 - बिबट्या असं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो. त्यात तो समोर आला ...

VIDEO: ... when the dogs catch the leopard | VIDEO: ...जेव्हा कुत्रे बिबट्याला पळवून लावतात

VIDEO: ...जेव्हा कुत्रे बिबट्याला पळवून लावतात

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - बिबट्या असं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो. त्यात तो समोर आला तर काय होईल याची कल्पनाही करवणार नाही. असाच एक बिबट्या मालाडच्या एका रहिवासी भागात घुसला होता. विशेष म्हणजे या बिबट्याला कुत्र्यांनी पळवून लावलं. तीन ते चार कुत्र्यांनी बिबट्याचा सामना करत त्याला माघारी फिरायला भाग पाडलं. आता हे कोणी सांगितलं असतं तर विश्वास ठेवणं कठीण झालं असतं. पण या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून कुत्र्यांचा बिबट्यासोबतचा लढा कैद झाला आहे. 
 
मालाडच्या गिरीकुंज सोसायटीत ही घटना घडली आहे. सोसायटीमागे डोंगराळ भाग असल्याने तिथूनच हा बिबट्या आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हा अंदाज असून नेमकी माहिती मिळालेली नाही. वनविभागातर्फे बिबट्याचा शोध सुरु असून तो नेमका घुसला कुठून हे तपासलं जात आहे. सुदैवाने बिबट्या शिरला तेव्हा सोसायटीत खाली कोणीही नव्हतं. 
 

https://www.dailymotion.com/video/x844tdw

Web Title: VIDEO: ... when the dogs catch the leopard