VIDEO - शॉर्ट सर्कीटमुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

By Admin | Updated: June 28, 2017 21:06 IST2017-06-28T21:02:15+5:302017-06-28T21:06:52+5:30

 ऑनलाइन लोकमत  मुंबई, दि. 28 - झाडाची फांदी लोकलच्या ओव्हरहेड वायरवर पडून शॉर्ट सर्कीट झाल्याने बुधवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेमार्गावरील ...

VIDEO - Western Railway disrupts due to short circuit | VIDEO - शॉर्ट सर्कीटमुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

VIDEO - शॉर्ट सर्कीटमुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 28 - झाडाची फांदी लोकलच्या ओव्हरहेड वायरवर पडून शॉर्ट सर्कीट झाल्याने बुधवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.  त्यामुळे कामावरुन घरी परतणा-या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. लोअर परेल ते एल्फिन्स्टन स्थानका दरम्यान ही घटना घडली. 
 
शॉर्ट सर्कीट झाल्यानंतर आगीचा लोळही उठला होता. या मार्गावर गाडया काही मिनिटे उशिराने धावत असून, रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे. या शॉर्ट सर्कीटमुळे चर्चगेट ते विरार मार्गावरच्या लोकल वाहतूकीवर परिणाम झाला. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अशा मनस्तापाचा सातत्याने सामना करावा लागतो. 
 
आज सकाळीच रुळाखालील खडी वाहून गेल्याने हार्बर रेल्वे ठप्प झाली होती. आज सकाळपासून मुंबईत पाऊस कोसळत होता. त्यात आता पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्याने नागरीकांचे हाल होत आहेत. 
https://www.dailymotion.com/video/x8456t8

Web Title: VIDEO - Western Railway disrupts due to short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.