VIDEO : आधी मतदान नंतर लग्न
By Admin | Updated: February 21, 2017 14:52 IST2017-02-21T13:17:59+5:302017-02-21T14:52:59+5:30
ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. २१ - नाशिक मतदानाचा टक्का वाढताना दिसत असून नागरिक मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडत आहेत. ...
VIDEO : आधी मतदान नंतर लग्न
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २१ - नाशिक मतदानाचा टक्का वाढताना दिसत असून नागरिक मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडत आहेत. नाशिकमधील माणिक्षानगर येथे राहणा-या एका युवतीने तर लग्नाच्या बोहोल्यावर चढण्याआधी मतदान करुन कर्तव्य पार पाडले. भाग्यश्री जगताप असे त्या तरूणीचे नाव असून तिचे आज सकाळी ११ वाजता तिच्या लग्नाचा मुहुर्त होता. मात्र मतदान करूनच लग्न करायचे असा निश्चय केलेल्या भाग्यश्रीने ८ वाजता वाजता द्वारका येथील अठल बिहारी वाचपाई शाळेत जाऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पडले. तिच्यासोबत आलेल्या व-हाड्यांनीही मतदान केले आणि त्यानंतर ती लग्नाच्या बोहोल्यावर चढली.
https://www.dailymotion.com/video/x844rqb