VIDEO: वाई येथील महागणपती मंदिरात शिरले पाणी
By Admin | Updated: August 6, 2016 14:49 IST2016-08-06T14:49:29+5:302016-08-06T14:49:29+5:30
साता-यात तीन वर्षांनंतर प्रथमच 'कृष्णामाई' दुथडी भरुन वाहू लागली आहे. वाई येथील कृष्णाकाठच्या महागणपती मंदिरातही पाणी शिरले आहे

VIDEO: वाई येथील महागणपती मंदिरात शिरले पाणी
>ऑनलाइन लोकमत -
सातारा, दि. 6- मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपण्यास सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यातील सात धरणांमधून जवळपास पाऊण लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तीन वर्षांनंतर प्रथमच 'कृष्णामाई' दुथडी भरुन वाहू लागली आहे. वाई येथील कृष्णाकाठच्या महागणपती मंदिरातही पाणी शिरले आहे. मंदिरात पाणी शिरलं असल्या कारणाने भविकांसाठी दर्शन बंद करण्यात आलं आहे.