VIDEO- पथकाने जागल करून ठेवला उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर 'वॉच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 17:59 IST2016-12-27T17:59:53+5:302016-12-27T17:59:53+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 27 - जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता मिशनअंतर्गत गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. तरीही हागणदारी कमी ...

VIDEO- पथकाने जागल करून ठेवला उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर 'वॉच'
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 27 - जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता मिशनअंतर्गत गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. तरीही हागणदारी कमी होत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी आता स्वच्छता पथकेच गावात मुक्कामी ठेवण्यास सुरुवात केली आहे. पथकाच्या वतीने रात्रभर शेकोट्या पेटवून जागल करून उघडयावर शौचास जाणाऱ्यांवर वॉच ठेवत असल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची मोठी पंचायत झाली असल्याचे कारंजा तालुक्यातील पारवा येथे दिसून आले. उघड्यावरील शौचालयाने होणारे दुष्परिणामाबाबत जनजागृती करूनही काही ग्रामस्थ शौचालय बांधकामास बगल देत आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गुडमॉर्निंग पथकासह जिल्हा परिषदेच्या दोन सल्लागारांसह तालुका समन्वयकाची नियुक्ती करून त्यांना गावोगावी मुक्कामी ठेवण्याचा निर्णय मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी घेतला. अनेक गावांमध्ये आता 31 डिसेंबरपर्यंत पथक गावात ठिय्या देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना मज्जाव करणार आहे. यामुळे गावातील ज्या नागरिकांकडे शौचालय नाही त्यांची चांगलीच पंचाईत झाली.
रात्रभर पथकाने दिला गावात पहारा
कारंजा तालुक्यातील पारवा येथे पथक रात्री मुक्कामी थांबली असताना त्यांनी वेळोवेळी हागणदारीच्या ठिकाणी भेटी देऊन कलापथकाच्या वतीने जनजागृतीपर गीते गायलीत. तसेच भोंग्याद्वारे उघडयावर शौचास न जाण्याचे आवाहन केले. रात्रभर गावात शेकोट्या पेटवून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर वॉच ठेवला.
https://www.dailymotion.com/video/x844mkt