VIDEO : हे पहा आणि एटीएम चोरांपासून सावध रहा

By Admin | Updated: August 10, 2016 14:47 IST2016-08-10T14:37:00+5:302016-08-10T14:47:01+5:30

तिरुअनंतपुरम येथून एका रोमानियन नागरिकाला एटीएममधून कॅश चोरल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.

VIDEO: Watch it and beware of ATM thieves | VIDEO : हे पहा आणि एटीएम चोरांपासून सावध रहा

VIDEO : हे पहा आणि एटीएम चोरांपासून सावध रहा

ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. १० - तिरुअनंतपुरम येथून एका रोमानियन नागरिकाला एटीएममधून कॅश चोरल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. तिरूअनंतपुरम येथील एसबीआय एटीएममधून कॅश चोरल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचच्या सहका-यांच्या मदतीने तिरूअनंतपुरम पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीमध्ये ३० जून २०१६ रोजी घडलेला चोरीचा हा प्रकार कैद झाला आहे. त्यामध्ये एका इसमाने एटीएम सेंटरमध्ये घुसून वरच्या बाजूस एक छुपा कॅमेरा बसवला. त्यामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यास आलेल्या व्यक्तीचा कार्ड नंबर व पिन नंबर त्या कॅमे-यात कॅप्चर होतो. व त्यातून मिळालेल्या माहितीचा गैरवापर करून कोणीही तुम्हाला लुबाडू शकतो.
त्यामुळे यापुढे एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याआधी कोठेही छुपा कॅमेरा बसवला नाही ना हे तपासून पहा, त्याबाबत तेथील सुरक्षारक्षाकास त्याची माहिती द्या व सतर्क रहा..
 

Web Title: VIDEO: Watch it and beware of ATM thieves