VIDEO : स्वच्छतेसाठी झपाटला वाशिम जिल्हा!

By Admin | Updated: September 2, 2016 14:36 IST2016-09-02T14:28:52+5:302016-09-02T14:36:44+5:30

सर्वांगीण स्वच्छतेसाठी संपूर्ण वाशिम जिल्हा अक्षरश: झपाटल्याचे दिसून येत आहे.

VIDEO: Washim district for cleanliness! | VIDEO : स्वच्छतेसाठी झपाटला वाशिम जिल्हा!

VIDEO : स्वच्छतेसाठी झपाटला वाशिम जिल्हा!

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २ -  जिल्हा परिषदेकडून हाती घेण्यात आलेल्या कुटुंबस्तर संवाद अभियानाला सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सर्वांगीण स्वच्छतेसाठी संपूर्ण जिल्हा अक्षरश: झपाटल्याचे दिसून येत आहे.
उघड्यावर होणाºया हागणदारीला कायमस्वरूपी ‘ब्रेक’ लावण्याकरिता जिल्हा परिषदेतील स्वच्छता कक्षाच्या चमूने यशस्वी पुढाकार घेतला आहे. विशेष बाब म्हणजे गावोगावी होणाºया स्वच्छताविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख स्वत: उपस्थित राहत आहेत. यादरम्यान गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिलांना सोबत घेवून प्रचारफेºयांच्या माध्यमातून शौचालय बांधण्याविषयी प्रभावी जनजागृती केली जात असल्याचे दिसून येत आहे.    
 
                      

Web Title: VIDEO: Washim district for cleanliness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.