VIDEO- मुख्यमंत्र्यांच्या घरी पूजा करणारा वाँटेड आरोपी
By Admin | Updated: September 8, 2016 23:55 IST2016-09-08T17:00:35+5:302016-09-08T23:55:35+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महादेवाचे केरवडे येथील परमानंद सावळाराम हेवाळेकर याचा खरा चेहरा आता लोकांसमोर उघड झाला

VIDEO- मुख्यमंत्र्यांच्या घरी पूजा करणारा वाँटेड आरोपी
अनंत जाधव, ऑनलाइन लोकमत
सावंतवाडी, दि. 8 - गावाने वाळीत टाकल्याचा बहाणा करण्याऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महादेवाचे केरवडे येथील परमानंद सावळाराम हेवाळेकर याचा खरा चेहरा आता लोकांसमोर उघड झाला आहे. हेवाळेकर याला गावातून कोणी बाहेर काढले नसून गावात कोठेही जातपंचायत हा प्रकार अस्तित्वात नाही. मात्र परमानंदचे गावातील वेगवेगळे प्रताप पुढे येऊ लागले आहेत.
तीन वर्षांपूर्वी परमानंद याने घराशेजारी महिला एकटीच घरात राहत असल्याची संधी साधून रात्रीच्या वेळी घरात शिरला. त्यानंतर त्या महिलेने त्याच्या विरोधात कुडाळ पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र या घटनेनंतर तो पसार झाला. तो पुन्हा गावात आलाच नाही. त्याच्याविरोधात अटक वॉरंट बजावून त्याची प्रत घरावर चिकटवण्यात आली.
सध्या परमानंद हा वेगवेगळ्या ठिकाणावरून गावातील प्रमुख मानकरी लोकांना सतत अश्लील पत्रे पाठवत असे. गावकरी सर्व पत्रे पोलिसांना देत असत. मात्र आपणास गावक-यांनी वाळीत टाकले, असा अर्ज त्याने तत्कालीन पोलीस अधीक्षकाकडे केला होता. त्यावेळी गावातील प्रमुखांना बोलावून तोडगा ही काढण्यात आला होता. गावक-यांनी गावात कोणतीच जात पंचायत नसून परमानंद याला गावात बंदी घातली नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणाची दखल घेत परमानंद यांना न्याय देण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.