VIDEO- मुलुंडमध्ये भिंत कोसळून १ ठार तर ११ जखमी
By Admin | Updated: September 25, 2016 15:14 IST2016-09-24T08:10:03+5:302016-09-25T15:14:27+5:30
मुलुंडच्या शास्त्रीनगर भागात भिंत कोसळून एक जण ठार तर ११ जण जखमी झाले.

VIDEO- मुलुंडमध्ये भिंत कोसळून १ ठार तर ११ जखमी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणा-या पावसामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असतानाच पावसामुळेच मुलुंडच्या शास्त्रीनगर भागात भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी झाले आहेत. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रशांत संतोष जाधव वय (१७) असे मृताचे नाव असून तर १५ जखमींवर मुलुंड अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जखमींची नावे -
सिद्धार्थ जाधव (१६), विजय जाधव (१६), तुकाराम हिरे (५०), महेंद्र नाईक (३५), अमोल सोनावणे (३०), जया वारंदे (३५), किरण राजू (४१), नीलेश गिरी (२७), अजय संतोष जाधव (२०), जयेश सुराडकर (२५), आरती संतोष जाधव (२०), कुसुम संतोष जाधव (४५), विनायक देनोका (४५), संतोष जाधव (५२), प्रमोद किरण (१०)