VIDEO : विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार प्रदान

By Admin | Updated: February 27, 2017 21:15 IST2017-02-27T20:42:13+5:302017-02-27T21:15:37+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 27 -  कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांना ...

VIDEO: Vijaya Raja Prakash has been given the Janasthan Award | VIDEO : विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार प्रदान

VIDEO : विजया राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार प्रदान

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 -  कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांना आज सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरात कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा दिनानिमित्त ज्ञानपीठाच्या तोंडाच्या असलेल्या या पुरस्कारांतर्गत एक लाख रुपये, मानपत्र, स्मृती चिन्ह डॉ. विजया राजाध्यक्ष यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी भाषा जगली तर देश जगेल असे सांगून डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी शाळा हा जीवनाचा पाया आहे, त्यामुळे मराठी भाषेच्या शिक्षणाकडे शासनाने लक्ष पुरवावे, मराठी शाळेच्या अस्तित्वासाठी नागरिकांनाही पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. याचबरोबर मधू मंगेश कर्णिक यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
डॉ. विजया राजाध्यक्ष या मराठी साहित्यात चौफेर विषयावर लेखन करणाऱ्या म्हणून परिचित असल्या तरी त्यांचा मुख्य कल हा कथा लेखकाचा राहिला आहे. त्या स्त्रीवादी लेखिका व समीक्षक म्हणून परिचित असून, त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालय व एसएनडीटी विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली, तर ‘अधांतर’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह त्यानंतर विदेही, अनोळखी, अकल्पित,  हुंकार आदिंसह १९ कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कथांमध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाचे चित्रण दिसून येते. डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी सन २000 मध्ये इंदूरमध्ये भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले असून, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 
 
https://www.dailymotion.com/video/x844t7a

Web Title: VIDEO: Vijaya Raja Prakash has been given the Janasthan Award