VIDEO : नाशिकमध्ये दुचाकीस्वारावर कोसळलं झाड, एका तासानंतर सुटका
By Admin | Updated: July 16, 2016 17:07 IST2016-07-16T16:45:45+5:302016-07-16T17:07:19+5:30
तब्बल एका तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाला झाडाखाली अडकलेल्या युवकाला वाचवण्यात यश आलं आहे

VIDEO : नाशिकमध्ये दुचाकीस्वारावर कोसळलं झाड, एका तासानंतर सुटका
ऑनलाइन लोकमत -
नाशिक, दि. 16 - वकिलवाडी वकिलवाडीतील जुने कडुनिंबाचे झाड शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळले. हे झाड अंगावर पडल्याने 3 जण झाडाखाली अडकले होते. तिघांनीही सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या झाडाखाली 2 कार, 5 दुचाकी आल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.
झाड दुचाकीस्वारावर पडल्याने त्याला काढण्याचे अथक प्रयत्न सुरु होते. तब्बल एका तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाला झाडाखाली अडकलेल्या युवकाला वाचवण्यात यश आलं आहे. दुचाकीस्वारावराचा पाय झाडाखाली तब्बल एक तास अडकून होता. नंदकिशोर वैद्य असं या तरुणाचं नाव असून इंदिरानगरचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.