व्हिडिओ : मल्हारी गाण्यावर रणवीरसह थिरकला आमिर...
By Admin | Updated: April 23, 2016 10:26 IST2016-04-23T10:22:16+5:302016-04-23T10:26:03+5:30
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द अॅवॉर्ड सोहळ्यादरम्यान रणवीर सिंग आणि आमीर खानने मल्हारी गाण्यावर डान्स करुन धम्माल उडवून दिली

व्हिडिओ : मल्हारी गाण्यावर रणवीरसह थिरकला आमिर...
ऑनलाइन लोकमत
मुंबई - 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द अॅवॉर्ड' सोहळ्यादरम्यान रणवीर सिंग आणि आमीर खानने मल्हारी गाण्यावर डान्स करुन धम्माल उडवून दिली. सोहळ्यादरम्यान आमीर खान आणि अमृता खानविलकरने रणवीर सिंगची मुलाखत घेतली. यावेळी रणवीरने बाजीराव मस्तानी चित्रपटाती मल्हारी गाण्यावर डान्स केला आणि आमीरलाही करायला लावला. आमीरनेदेखील त्याच्या रंग दे बसंती चित्रपटातील स्टेप करत धमाल डान्स केला.
या मुलाखतीदरम्यान रणवीरने आमीर खानचे चित्रपट पाहून मोठा झालो, आमीरकडून खुप काही शिकत असतो असं मनोगत व्यक्त केलं. महाराष्ट्र माझी जन्म आणि कर्मभूमी आहे, महाराष्ट्राचं मोठेपण त्याच्या नावातच आहे, असेही त्याने नमूद केले. दरम्यान ' हा पहिला पुरस्कार सोहळा आहे जिथे आमीर खानची भेट झाली,' अशी कोपरखळीही रणवीरने मारली.