शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:37 IST

आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्‍यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्‍यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया अशी तंबी अजित पवारांनी दिली.

नागपूर - बऱ्याचदा मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात. तिथे पक्षातील जिल्हाध्यक्षाला विचारत नाहीत, त्यांच्याकडे पाहतही नाहीत. त्यांच्याशी बोलत नाही. तो आपल्या परिवारातील घटक आहे त्यामुळे असं वागू नका. आपल्याला तसं करून चालणार नाही. माझ्यासह सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील मंत्र्‍यांचे कान टोचले आहेत. 

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाने वेळेला महत्त्व दिले पाहिजे. वेळेत कार्यक्रमाला आले पाहिजे. पुढच्या वेळी ठरलेल्या वेळेत कार्यक्रम सुरू व्हायला हवा. कार्यक्रमस्थळी दरवाजा बंद करावा का असा विचार सुरू आहे. विमानासारखे टेक ऑफ व्हायच्या दरवाजा बंद करून टाकतात. कुणाला किती गांभीर्य आहे हे एकदा कळू द्या. एक दिवस तुम्हाला वेळेत या सांगितले तरी काहींना त्रास होतो. सत्ता आणि पदांसाठी आपण पाऊल उचललं नव्हते तर महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयांची गरज आहे म्हणून आपण हा मार्ग स्वीकारला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्‍यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्‍यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया, ते दुसऱ्या कुणाला तरी देऊया. नुसते शिबिर घेऊन चालणार नाही. या शिबिरात जे निर्णय होतील त्यांची अंमलबजावणी करणार आहे. संघटना संघटनेचे काम करेल. काही गोष्टीत बदल करायच्या आहेत. पूर्वीच्या राजकारणात आणि आत्ताच्या राजकारणात जमीन अस्मानचा फरक आहे. सोशल मिडिया सक्रीय आहे. एखाद्या बाबींत मागचे पुढचे बाजूला करून काही क्लिप दाखवून ट्रोल केले जाते. काही कामे करत नाहीत त्यांना प्रसिद्धी मिळते. काही कामे करतात परंतु त्यांना प्रसिद्धी मिळत नाही असंही अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्यांना त्या त्या जिल्ह्यात जावे लागेल. फक्त १ मे, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी तेव्हाच जायचं असं नाही. त्या दिवशी जावेच लागेल त्याव्यतिरिक्त जिल्ह्यात काम करावे लागेल. तिथले जिल्हाधिकारी, प्रमुख आमदार, खासदार यांना सोबत घेऊन आपल्याला लोकांमध्ये फिरावे लागेल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस