Video - ठाण्याच्या घोडबंदर रोडवर आला अजगर

By Admin | Updated: August 4, 2016 14:11 IST2016-08-04T11:47:27+5:302016-08-04T14:11:32+5:30

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरुन बुधवारी रात्री भल्यामोठया अजगराने प्रवास केला. त्यामुळे काहीकाळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Video - Thaana Ghodbunder Road comes on the dragon | Video - ठाण्याच्या घोडबंदर रोडवर आला अजगर

Video - ठाण्याच्या घोडबंदर रोडवर आला अजगर

ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. ४ - ठाण्याच्या घोडबंदर रोडवरुन बुधवारी रात्री भल्यामोठया अजगराने प्रवास केला. त्यामुळे काहीकाळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरुन जाणा-या करण अहिरे यांच्या नजरेस सर्वप्रथम हा अजगर पडला. 
 
नागपूरहून दुचाकीवरुन आलेले अहिरे आणि त्यांचे मित्र ठाण्याच्या दिशेने जात असताना घोडबंदर रोडवर अजगराची हालचाल अहिरे यांच्या नजरेस पडली. अहिरे  आणि त्यांचे मित्र तात्काळ बाईक थांबवून अजगराजवळ गेले. महामार्गावरील कोणत्या वाहनाखाली हा अजगर येऊ नये यासाठी अहिरे आणि त्यांच्या मित्रांनी काही वेळ वाहतुकीचे व्यवस्थापन करीत अजगराला सुरक्षित मार्ग करुन दिला. 
 
महामार्ग ओलांडून तो अजगर संजय गांधी राष्ट्रीय अभयरण्यात  सुखरूप निघून गेला. जवळपास दहा फूटांचा तो अजगर होता असे करण अहिरे यांनी सांगितले. अहिरे  श्वान प्रशिक्षक होते. 
 
 

Web Title: Video - Thaana Ghodbunder Road comes on the dragon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.