VIDEO : वाशिममध्ये बंजारा समाजातील तीज उत्सवाची सांगता
By Admin | Updated: August 29, 2016 20:10 IST2016-08-29T18:49:30+5:302016-08-29T20:10:07+5:30
बंजारा समाजातील ९ दिवसांपासून सुरु असलेल्या तीज उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी शेकडो बंजारा समाजातील महिला व पुरुषांचा यामध्ये सहभाग होता.

VIDEO : वाशिममध्ये बंजारा समाजातील तीज उत्सवाची सांगता
- नंदकिशोर नारे
वाशिम, दि. 29 - बंजारा समाजातील ९ दिवसांपासून सुरु असलेल्या तीज उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी शेकडो बंजारा समाजातील महिला व पुरुषांचा यामध्ये सहभाग होता. झिंग झिंग झिंगाट गितापासून तर बंजारा समाजातील पारंपारिक नृत्याचे यामध्ये सहभाग होता.
प्राचिन पंरपरेपासून बंजारा समाजात तीज उत्सवाचे आयोजन केल्या जाते. पूर्वी काळी ‘लदेनी’ (मिठाचा तसेच इतर व्यापार) करीत असतांना सर्व बंजारा समाज बांधव पावसाळयात एकत्र यायचा. ज्या मुली लग्न होवून सासरला जातात त्यांच्यासाठी हा नऊ दिवसाचा खास उत्सव. नऊ दिवस विविध कार्यक्रम साजरे करुन शेवटच्या दिवशी या तीज उत्सवाचे विसर्जन केल्या जाते. नवव्या दिवशी ‘मोळया’ (राधाकृष्णाच्या मुर्तीचे पूजन व जेवणाचा कार्यक्रम) करुन मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत पारंपारिक नृत्यावर महिला नृत्य करतात. २८ आॅगस्ट रोजी ५.३० वाजता शहरातून तिज उत्सव सांगता मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तांडा नायक दिलीप जाधव, बबन राठोड, किशोर राठोड, डॉ. विजय जाधव, सुभाष चव्हाण, शेरा पेंटर, कैलास जाधव, पी.जी. राठोड, जिल्हा परिषद सभापती पानुताई जाधव यांच्यासह शेकडो बंजारा महिला पुरुषांची उपस्थिती लाभली होती. यावेळी बंजारा समाजातील युवतींनी पारंपारिक गीतावर नृत्य करुन आम्ही नऊ दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ मैत्रिणीप्रमाणे , सखीप्रमाणे साथ दिली. असे बंजारा गीतामध्ये म्हणतांना आढळून आल्यात.
‘आजे रो दन रे तोई जो
मारी सातळ ये ‘गुजरातनये’
आजे रो दन रे तोई जो....