VIDEO : वडापाव खाल्ला म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला केली मारहाण

By Admin | Updated: August 25, 2016 16:18 IST2016-08-25T15:49:54+5:302016-08-25T16:18:46+5:30

वडापाव खाल्ला म्हणून सातवीतील विद्यार्थ्याला वसतीगृहातील शिक्षकाने सलग चार दिवस बेदम मारहाण करून बाथरूममध्ये कोंडले.

VIDEO: The teacher kicked the student as Vada Pav Khaal | VIDEO : वडापाव खाल्ला म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला केली मारहाण

VIDEO : वडापाव खाल्ला म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याला केली मारहाण

ऑनलाइन लोकमत
 
बीड, दि. २५ -   सातवीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्याला वसतीगृहातील शिक्षकाने सलग चार दिवस बेदम मारहाण करून त्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्याच्या प्रकारामुळेयेथील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुलाने तो शिक्षक परगावी गेल्यानंतर तेथून स्वत:ची सुटका करून घेतल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला मारहाण इतकी आमानुष करण्यात आली आहे की त्याच्या पाठीवर आणि पोटावर बेल्टचे वळ उमटले असून त्याचे समोरचे दोन दातही पडले आहेत.
 
आदित्य राठोड असे या मुलाचे ना असून तो आदर्श विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकतो. येथील जिजाऊ वसतीगृहात तो राहतो. . याच शाळेतील शिक्षक दिलीप जोगदंड हा स्वत:चे खासगी वसतीगृह चालवितो. या वसतीगृहात आदित्य राहत होता. रविवारी त्याने वडा पाव खाल्याचे माहिती झाल्यानंतर जोगदंड याने आदित्यला हॉस्टेलची फी वेळेवर देत नाही आणि वडा पाव खायला मात्र तुझ्याकडे पैसे आहेत, असे म्हणत चमड्याच्या बेल्टने त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर त्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवले. 
 
जोगदंड गुरूवारी परगावी गेल्यानंतर या मुलाने स्वत:ची सुटका करून घेतली आणि तो त्याच्या पाचेगाव येथे राहणाºया आईकडे गेला. यानंतर दुपारी आदित्यसह त्याच्या आईने व आजोबाने पोलीसात तक्रार दिली.
 
 
 

Web Title: VIDEO: The teacher kicked the student as Vada Pav Khaal