VIDEO: वॅक्स म्युझिअममध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पुतळा
By Admin | Updated: May 27, 2017 19:29 IST2017-05-27T19:29:29+5:302017-05-27T19:29:29+5:30
ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 27 - लोणावळ्याच्या वॅक्स म्युझिअममध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पुतळाही दिसणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय ...

VIDEO: वॅक्स म्युझिअममध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पुतळा
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 27 - लोणावळ्याच्या वॅक्स म्युझिअममध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पुतळाही दिसणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी आज २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
लोणावळ्याच्या वॅक्स म्युझिअममध्ये अनेक सेलिब्रेटी आणि प्रसिद्द लोकांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. वॅक्स स्टॅच्युच्या सेलेब्रिटी रांगेत आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही बसणार आहेत. पुतळा सध्या नागपुरातील गडकरी वाड्यात ठेवण्यात आला आहे.
सुनील कुडालू यांनी या गडकरींच्या पुतळ्याची निर्मिती केली आहे. नितीन गडकारींच्या वॅक्स स्टॅच्युचं अनावरण स्वत: नितीन गडकरींच्याच हस्ते करण्यात आलं. मेणाचे गडकरी पाहण्यासाठी गडकरी वाड्यात लोकांची गर्दी झाली होती.
खुर्चीवर स्मितहास्य देत बसलेले नितीन गडकरी एकदम हुबेहूब दिसत आहेत. पुतळा एवढा हुबेहूब आहे की, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या पुतळ्यालाच शुभेच्छा दिल्या.