VIDEO : मराठा क्रांती मोर्चास प्रारंभ

By Admin | Updated: September 19, 2016 13:43 IST2016-09-19T13:43:27+5:302016-09-19T13:43:27+5:30

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी अशा विविध मागण्यांसाठी अकोल्यात मोर्चाला प्रारंभ झाला आहे.

VIDEO: Start the Maratha Revolution Morcha | VIDEO : मराठा क्रांती मोर्चास प्रारंभ

VIDEO : मराठा क्रांती मोर्चास प्रारंभ

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १९ -  कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी अकोल्यात आयोजित मोर्चाला प्रारंभ झाला असून, लाखो नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत.
मोर्चात सहभागी होण्यासाठी केवळ जिल्ह्यातील नागरिकांचे जत्थे अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर पोहचले अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लाखो नागरिक सहभागी झाले आहेत. मोर्चासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून, जागोजागी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. वाहतूकीला अडथळा होऊ नये म्हणून, मुख्य वाहतूक वळविण्यात आली आहे.  मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असून, अत्यंत शांतपणे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कूच करत आहे.
 
 

Web Title: VIDEO: Start the Maratha Revolution Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.