VIDEO - जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लागणार एसएमडी लीड टिव्ही
By Admin | Updated: September 21, 2016 20:55 IST2016-09-21T20:55:05+5:302016-09-21T20:55:05+5:30
शासकिय प्रकल्पांच्या जनजागृतीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दर्शनी ठिकाणी एसएमडी लीड टिव्ही लावले जात आहे.

VIDEO - जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लागणार एसएमडी लीड टिव्ही
संजय खांडेकर
अकोला, दि. २१ : शासकिय प्रकल्पांच्या जनजागृतीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दर्शनी ठिकाणी एसएमडी लीड टिव्ही लावले जात आहे. राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना आणि प्रकल्पांची जनजागृती या मोठ्या लीड टिव्ही द्वारे होणार आहे. गत दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्क्रीन उभारण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत आणि विशाल हिमालय फाऊंडेशन पदाधिकारी उदय वझे, पंकज कोठारी यासाठी पुढाकार घेत आहेत.