VIDEO : विद्युत प्रवाहाची केबल पडल्याने सहा मोटारसायकली जळून खाक
By Admin | Updated: August 26, 2016 18:08 IST2016-08-26T17:56:32+5:302016-08-26T18:08:03+5:30
शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वाईन बारच्या मागे उभ्या असलेल्या सहा मोटारसायकली आणि एक सायकल विद्युत प्रवाह असलेल्या केबल पडल्याने जळून खाक

VIDEO : विद्युत प्रवाहाची केबल पडल्याने सहा मोटारसायकली जळून खाक
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 26 - शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वाईन बारच्या मागे उभ्या असलेल्या सहा मोटारसायकली आणि एक सायकल विद्युत प्रवाह असलेल्या केबल पडल्याने जळून खाक झाल्याची घटना दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली.
वाशिम- हिंगोली रस्त्यावरील शहरापासून तीन किलो मिटर अंतरावर असलेल्या एका वाईन बारच्या मागे अवैध जुगार खेळल्या जात होता. त्या ठिकाणी काही मोटारसायकली व सायकली उभ्या असतांना अचानक एल.टी. विद्युत प्रवाहाची केबल एका मोटारसायकलवर पडला. त्यामध्ये विद्युत प्रवाह असल्याने गाडीने पेट घेतला. यामुळे बाजुला असलेल्या गाड्यांनाही आग आगली. यात सहा गाडया तर एक सायकल जळून खाक झाली.