VIDEO : नाशिकमध्ये तिकीट वाटपावरुन शिवसेनेच्या 2 गटात हाणामारी

By Admin | Updated: February 3, 2017 14:02 IST2017-02-03T13:58:50+5:302017-02-03T14:02:14+5:30

 ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 3 -तिकीट वाटपावरुन शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला. माजी महापौर विनायक पांडे आणि शिवसेना महानगरप्रमुख ...

VIDEO: Shot of Shiv Sena in Nashik | VIDEO : नाशिकमध्ये तिकीट वाटपावरुन शिवसेनेच्या 2 गटात हाणामारी

VIDEO : नाशिकमध्ये तिकीट वाटपावरुन शिवसेनेच्या 2 गटात हाणामारी

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 3 -तिकीट वाटपावरुन शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला. माजी महापौर विनायक पांडे आणि शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांचे समर्थक एकमेकांत भिडले. नाशिमधील चांडक सर्कल परिसरात एबी फॉर्मचं वाटप सुरू असताना  ही घटना घडली.
 
यावेळी विनायक पांडे आणि अजय बोरस्ते यांच्यात बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.  पांडे गटाने अजय बोरस्ते यांना मारहाण केली. त्यानंतर बोरस्ते गटानेदेखील पांडे गटाला प्रत्युत्तर दिले. 
 
दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. 
 
https://www.dailymotion.com/video/x844qbz

Web Title: VIDEO: Shot of Shiv Sena in Nashik