VIDEO-सुशीलकुमार शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिल्पकृती
By Admin | Updated: August 23, 2016 07:02 IST2016-08-23T07:02:03+5:302016-08-23T07:02:03+5:30
. सोलापूरच्या या महान व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्यासाठी यंदा त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे.

VIDEO-सुशीलकुमार शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिल्पकृती
दीपक होमकर/ यशवंत सादूल :
सोलापूर, दि. 23 - अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या सोलापुरातील सुशीलकुमार शिंदे यांनी देशाच्या गृहमंत्रिपदाला गवसणी घातली. इतकेच नव्हे तर गृहमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अजमल कसाब, अफजल गुरू सारख्या दहशतवाद्यांना न्यायालयाने दिलेली फाशीची अंमलबजावणी करत सर्वात यशस्वी व लोकप्रिय गृहमंत्री बनण्याचा मान मिळविला. सोलापूरच्या या महान व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्यासाठी यंदा त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांनी त्यांचे शिल्प तर चित्रकार राम खरटमल यानी त्यांचे चित्र साकारले आहेत. दीड-दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात काव्य मैफलीची रंगत पाहायला मिळाली आहे.