VIDEO : कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची शान मेबॅक
By Admin | Updated: October 11, 2016 12:53 IST2016-10-11T11:39:36+5:302016-10-11T12:53:12+5:30
कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराजांनी १९३६ साली इंग्लंड येथील रोल्स रॉईस या मोटार कंपनीला चार चाकी गाडी बनवण्याची आॅर्डर दिली

VIDEO : कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची शान मेबॅक
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ - कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराजांनी १९३६ साली इंग्लंड येथील रोल्स रॉईस या मोटार कंपनीला चार चाकी गाडी बनवण्याची आॅर्डर दिली होती. ध्वजाचा भगवा रंग (सॅफरॉन), छत्रपतींचा शिक्का अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली मेबॅक गाडी कोल्हापूरात आणण्यात आली. हीच गाडी दस-याला कोल्हापूरची शान असते.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी छत्रपती शिवरायांना तलवार देत असलेले चित्र गाडीच्या दर्शनी भागावर आहे. बीवायएफ-८७७६ हा क्रमांक या गाडीवर आहे. कोल्हापूरात आणल्यावर गाडीला कोल्हापूर-१ हा क्रमांक देण्यात आला. १७ फूट ५ इंच लांब, ६ इंच आणि ६ फूट रुंदीच्या या गाडीत ६ व्यक्ती बसू शकतात. हादरे बसू नये यासाठी सस्पेन्शन सिस्टीम आहे. सुर्यप्रकाशाचा त्रास होवू नये यासाठी टिंटेड ग्लास आहेत. कापडी छत उघडझाप करता येते. गाडीचा हॉर्न रेल्वे प्रमाणे असला तरी कर्कश नाही. गाडीचे पहिले टायर ५० वर्षांनंतर बदलण्यात आले. आता टायर बदलून सुमारे २० वर्षे लोटली. सध्या या गाडीचे कोणतेही पार्टस उपलब्ध नाहीत.