VIDEO: मास्टर-ब्लास्टरचा मुंबई पोलिसांना सलाम

By Admin | Updated: September 21, 2016 18:35 IST2016-09-21T18:35:51+5:302016-09-21T18:35:51+5:30

विपरीत परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडणा-या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव दक्ष असणा-या मुंबई पोलिसांसाठी भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हृदयात खूप सन्मान

VIDEO: Salute to Master-Blaster Mumbai Police | VIDEO: मास्टर-ब्लास्टरचा मुंबई पोलिसांना सलाम

VIDEO: मास्टर-ब्लास्टरचा मुंबई पोलिसांना सलाम

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.21- विपरीत परिस्थितीत आपली जबाबदारी पार पाडणा-या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी  सदैव दक्ष असणा-या मुंबई पोलिसांसाठी भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हृदयात खूप सन्मान आहे. मास्टर-ब्लास्टरने फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे हे सिद्ध होतं. 
 
मुंबई पोलीस भर पावसात ट्राफीक हाताळत असतानाचा एक व्हिडिओ सचिनने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला.  हा व्हिडीओ आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवर शेअर करताना सचिनने मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला आहे. आपल्या मोबाईलमध्ये त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. 
 
व्हिडीओ शेअर करताना केलेल्या पोस्टमध्ये  सचिन म्हणतो, 'मुसळधार पाऊस असो किंवा रणरणतं ऊन मुंबई पोलीस मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असतात, मुंबई पोलिसांना माझा सलाम'.
पाहा व्हिडीओ-

Web Title: VIDEO: Salute to Master-Blaster Mumbai Police