VIDEO : प्रवाशांची अडवणूक करणा-या ग्रुपवर लोकलमध्ये RPF चा लाठीमार
By Admin | Updated: October 20, 2016 11:29 IST2016-10-20T09:27:02+5:302016-10-20T11:29:58+5:30
लोकलमध्ये प्रवाशांची अडवणूक करून त्यांना उतरू न देणा-या ग्रुपवर आरपीएफ जवानांनी कारवाई करत त्यांच्यावर लाठीमार केल्याची घटना बुधवारी रात्री विरारमध्ये घडली.

VIDEO : प्रवाशांची अडवणूक करणा-या ग्रुपवर लोकलमध्ये RPF चा लाठीमार
ऑनलाइन लोकमत
विरार, दि. २० - लोकलमध्ये प्रवाशांची अडवणूक करून त्यांना उतरू न देणा-या ग्रुपवर आरपीएफ जवानांनी कारवाई करत त्यांच्यावर लाठीमार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मात्र ही कारवाई राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप डहाणूच्या प्रवाशांनी केला आहे.
चर्चगेटहून डहाणूला जाणा-या लोकलमधील डहाणूच्या रेल्वे प्रवाशांचा ग्रुप विरारच्या प्रवाशांवर अरेरावी करत त्यांना उतरु देत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याच कारणास्तव आरपीएफच्या जवानांनी बुधवारी रात्री विरार येथे या प्रवाशांवर कारवाई केलीय
चर्चगेट येथून रात्री ८.२७ मिनिटांनी डहाणूला जाणारी लोकल सुटते. ही गाडी रात्री १०.३०च्या सुमारास विरार येथे पोहोचली असता आरपीएफचे जवान गाडीत चढले व त्यांनी काही प्रवाशांवर लाठीमार केला. सुमारे १४ प्रवाशांवर चेन खेचणे, रेल्वेत हंगामा करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या आरोपाअतंर्गत कारवाई करण्यात आली.
चर्चगेटहून रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी सुटणाऱ्या चर्चगेट-डहाणू लोकल मधल्या प्रवाशांवर विरारमध्ये बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास लाठीमार करण्यात आला. 14 प्रवाशांवर चेन खेचणे, रेल्वेत हंगामा करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे या अंतर्गत कारवाई केली आहे.
कारवाईचे नेमके कारण काय?
डहाणू लोकल आणि मेल एक्सप्रेस मधून भाईंदर आणि वसई विरार मधील प्रवाशी प्रवास करीत असल्याने सफाळे, पालघर आणि डहाणू येथील प्रवाशांनी विरोध दर्शवणे सुरु केले होते. त्यातूनच दोन गट तयार होऊन लोकल आणि मेल एक्सप्रेस मध्ये भांडणे सुरु झाली होती. याप्रकरणी प्रवाशांनी तक्रार नोंदवल्यानंतर बुधवारी रात्री आरपीएफ जवानांनी ही कारवाई केली.