VIDEO : राज ठाकरे सपत्नीक एकविरा देवीच्या दर्शनाला

By Admin | Updated: October 8, 2016 15:29 IST2016-10-08T14:59:49+5:302016-10-08T15:29:46+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी लोणावळ्याजवळील कार्ला गडावर पत्नी शालिनी ठाकरे व दोन्ही मुलांसमवेत येऊन कुलस्वामींनी आई एकविरेचे दर्शन घेतले.

VIDEO: Raj Thackeray's dream Ek Devir | VIDEO : राज ठाकरे सपत्नीक एकविरा देवीच्या दर्शनाला

VIDEO : राज ठाकरे सपत्नीक एकविरा देवीच्या दर्शनाला

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. ८ -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी लोणावळ्याजवळील कार्ला गडावर पत्नी शालिनी ठाकरे व दोन्ही मुलांसमवेत येऊन कुलस्वामींनी आई एकविरेचे दर्शन घेतले. 
        कार्ला गडावरील एकविरा देवी ही ठाकरे परिवाराची कुलस्वामींनी आहे. दरवर्षी नवरात्रा मध्ये राज ठाकरे सपत्निक येऊन देवीचे दर्शन घेतात. आज अष्टमीच्या दिवशी सकाळी ११:३० वाजता राज ठाकरे गडावर दाखल झाले. देवीच्या गाभार्‍यात सपत्निक बसून त्यांनी देवीची पुजा करत दर्शन घेतले. गडावर केवळ देवीच्या दर्शनासाठी आले असल्याने राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही. त्यांच्या स्वागतासाठी मनसेचे मावळ तालुक्यातील व पिंपरी चिंचवड भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त काळूराम देशमुख, विजय देशमुख यांनी ट्रस्टच्या वतीने आई एकविरा देवीची प्रतिमा व हार नारळ देऊन स्वागत केले. गुरव समाजातील महिलांनी राज ठाकरे यांचे औक्षण केले. शनिवार आज सुट्टीचा दिवस असल्याने गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.
 
 

Web Title: VIDEO: Raj Thackeray's dream Ek Devir