VIDEO : राधाकृष्ण विखे-पाटील भाजपचे पपेट - मोठ्या भावाचा आरोप

By Admin | Updated: March 8, 2017 17:41 IST2017-03-08T14:55:59+5:302017-03-08T17:41:20+5:30

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. ८ - विखे-पाटील घराण्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील ...

VIDEO: Radhakrishna Vikhe-Patil BJP's puppet - big brother's allegation | VIDEO : राधाकृष्ण विखे-पाटील भाजपचे पपेट - मोठ्या भावाचा आरोप

VIDEO : राधाकृष्ण विखे-पाटील भाजपचे पपेट - मोठ्या भावाचा आरोप

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - विखे-पाटील घराण्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीरपणे प्रवरा ग्रामीण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षपद स्वत:कडे घेतले आहे, असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे बंधू अशोक विखे पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
 
'बाळासाहेब विखे पाटील यांनी सुमारे अडीच वर्षापूर्वी माझ्याकडे प्रवरा ग्रामीण एज्युकेश सोसायटीची जबाबादारी दिली होती.त्यानुसार धर्मदाय आयुक्त कार्यालयात याबाबतचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मात्र,या प्रस्तावास अध्याप मंजूरी देण्यात आली नाही.परंतु,राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रस्ताव सादर करून त्यास एका दिवसात मंजूरी घेतली. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी ही मंजूरी घेतली आहे.त्यामुळे याबाबत मी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे' असे अशोक यांनी सांगितले.
 झकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनकडून प्रवरा मेडिकल महाविद्यालयाने दोन कोटी रुपयांचा निधी घेतला असल्याचा आरोपही अशोक यांनी यावेळी केला. मेडिकल कॉलेजचे उपाध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. ईडीच्या एका अधिका-याकडून ही माहिती समजली असल्याचेही त्यांनी सांगितले.बाळासाहेब विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था स्वता:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखे पाटील व राजेंद्र विखे पाटील करत असल्याचा आरोपही अशोक विखे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
 
विखे-पाटील भाजपचे पपेट 
 
राधाकृष्ण विखे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे पपेट आहेत.शासनाविरोधात आरोप केल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तरे द्यावीत हे विखे-पाटील मुख्यमंत्र्यांना सांगतात,असा गंभीर आरोपही अशोक विखे पाटील यांनी केला आहे.
 
https://www.dailymotion.com/video/x844tqn

Web Title: VIDEO: Radhakrishna Vikhe-Patil BJP's puppet - big brother's allegation