VIDEO - धान्य, भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकून नोंदविला निषेध
By Admin | Updated: June 3, 2017 17:24 IST2017-06-03T17:24:29+5:302017-06-03T17:24:58+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 3 - राज्यशासनाच्या धोरणांविरूद्ध संतप्त झालेल्या शेतकºयांनी शनिवार, ३ जून रोजी स्थानिक तहसील कार्यालयावर भव्य ...

VIDEO - धान्य, भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकून नोंदविला निषेध
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 3 - राज्यशासनाच्या धोरणांविरूद्ध संतप्त झालेल्या शेतकºयांनी शनिवार, ३ जून रोजी स्थानिक तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी सहभागी शेतकºयांनी शासनविरोधी घोषणाबाजी देत धान्य, भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला.
अॅड. नकुल देशमुख मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या मोर्चाला रिसोड येथील मुख्य बाजारातून प्रारंभ झाला. तहसीलवर मोर्चा धडकल्यानंतर त्याठिकाणी शेतकरी, कष्टकरी, मजूरवर्गाने धान्य, भाजीपाला, दूध रस्त्यावर फेकून आपला संताप व्यक्त केला. पोकळ आश्वासने देवून शासन शेतक-यांची दिशाभूल करित आहे.
शेतक-यांच्या मालाला भाव नाही, शेतीला पुरेशी वीज मिळत नाही, राज्यभरातील शेतकरी कर्जात आकंठ बुडाला असताना शासनाने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार अवलंबिला आहे.
https://www.dailymotion.com/video/x845140