VIDEO- पुण्यात भाजपा शहराध्यक्षांच्या छायाचित्राला फासले काळे

By Admin | Updated: February 3, 2017 21:16 IST2017-02-03T18:44:14+5:302017-02-03T21:16:36+5:30

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 3 - पुण्यात भाजपातील बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. भारतीय जनता पक्षाची उमेदवारी नाकारलेले इच्छुक उमेदवार ...

VIDEO: The photograph of the BJP President of Pune came to fruition | VIDEO- पुण्यात भाजपा शहराध्यक्षांच्या छायाचित्राला फासले काळे

VIDEO- पुण्यात भाजपा शहराध्यक्षांच्या छायाचित्राला फासले काळे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - पुण्यात भाजपातील बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. भारतीय जनता पक्षाची उमेदवारी नाकारलेले इच्छुक उमेदवार भाजपाविरोधातच आक्रमक झाले आहेत. या इच्छुकांनी भाजपाचा निषेध नोंदवत शुक्रवारी सायंकाळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या पोस्टरवरील छायाचित्राला काळे फासले.

 निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षात नव्याने आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपाच्या कार्यालयासमोरच या नाराज इच्छुकांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आंदोलक कार्यकर्त्यांनी भाजपावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. भाजपामध्ये पैसे खाऊन उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. तर अनेक महिला उमेदवारांना एबी फॉर्म देऊनही ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्यानं भाजपा कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला बंडखोरांची मनधरणी करावी लागणार आहे. 

https://www.dailymotion.com/video/x844qec

Web Title: VIDEO: The photograph of the BJP President of Pune came to fruition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.