VIDEO: उंदिरमामांनी घेतले गणरायाचे दर्शन

By Admin | Updated: September 14, 2016 21:29 IST2016-09-14T21:28:18+5:302016-09-14T21:29:04+5:30

गणपतीचं वाहन म्हणून ओळखल्या जाणा-या उंदिरमामांनी बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावल्याची अनोखी घटना चिपळूण तालुक्यातील अलोरे गावी घडली आहे

VIDEO: The philosophy of Ganesha took place | VIDEO: उंदिरमामांनी घेतले गणरायाचे दर्शन

VIDEO: उंदिरमामांनी घेतले गणरायाचे दर्शन

ऑनलाइन लोकमत
चिपळूण, दि. 14 - गणेशोत्सवात सर्व भक्तजण आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेत असतात. मात्र गणपतीचं वाहन म्हणून ओळखल्या जाणा-या उंदिरमामांनी बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावल्याची अनोखी घटना चिपळूण तालुक्यातील अलोरे गावी घडली आहे. अलोरे येथील रमेश चिपळूणकर यांच्या निवासस्थानी गौरी पूजनाच्या दिवशी गणरायाचे वाहन मुषकराज प्रकट झाले. आणि त्यांनी पाटावरील चारही बाजूंनी गणरायाचे दर्शन घेतले.
 
तीन ते साडेतीन तास हा उंदीर गणरायाच्या चरणाशी लीन झाला होता. काहींनी त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. त्याला अगदी हातावरही घेतले गेले. तरीही तो उंदिर तेथून हटला नाही.
 
चिपळूणकरांच्या घरी आलेला हा उंदीर पाळीव नव्हता मात्र तरीही बाप्पांसमोर अत्यंत बिनधास्तपणे तो वावरत होता. उंदीरमामांना पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. अनेक जण घरी येऊन बाप्पासोबतच उंदराचंही दर्शन घेऊ लागले. अखेर 12 तासांच्या दर्शनानंतर उंदीरमामांनी परतीच्या मार्गावर निघाले. आता हा खरंच चमत्कार होता की दुसरं काही यावर आता वादविवाद सुरु आहेत. उंदरावर कशाचा तरी अंमल झाला असल्याचा दावा काहीजणांनी केला आहे.
 

Web Title: VIDEO: The philosophy of Ganesha took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.